पुणे, 26 मे : पुण्यात एकीकडे कोरोनाचा विळखा वाढत असताना प्रशासनासमोरचा ताण वाढताना दिसत आहे. अशात नागरिकांनी डॉक्टर, प्रशासनाला मदत करणं आवश्यक आहे. मात्र, पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाने थेट हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शेकडो रुग्ण नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आणि बरे होऊन घरी परतत आहे. परंतु, एका पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.  या रुग्णाने थेट पळून जाण्याचा प्रयत्न केला.  यावेळी डॉक्टर, कर्मचारी वारंवार सांगूनही संबंधित रुग्ण ऐकण्यास तयार नव्हता.
हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर असलेला रुग्ण थेट मुख्य गेटजवळ आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तरीही न ऐकता या व्यक्तीने थेट गेटच्या वर चढून बाहेर पडला. आणि रस्त्याने चालत निघाला, मात्र नंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर रुग्णाला पकडण्यात आले. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, हा रुग्ण मद्यपी असल्याचं सांगितलं जात असून दारू सोडण्याच्या नैराश्येतून याच रुग्णाने खिडकीच्या काचा फोडून तिथल्या डॉक्टरांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती नायडू हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ परिचारिकेनं न्यूज 18 लोकमतला दिली.
कोविड सेंटरवर कोरोनाबाधितांचा दारू पार्टीचा डाव
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील बालेवाडीतील मिकमार कोविड सेंटरमध्ये काही रूग्णांनी चक्क दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट मागवला होता. पण गेटवरील चेकींगमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला. नानापेठेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना मिकमार कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांसाठी त्यांच्या घरून जेवनाचा डबा येत असतो.
पोलिसांनी या डब्याची तपासणी केली असता आत चार दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट आढळून आला. जेवणाच्या डब्यासोबत दारूच्या बाटल्या पाहून पोलीस आणि पालिका प्रशासनही हादरून गेलं होतं. पोलिसांनी ज्या तरुणाने हा डबा आणला होता, त्याला चांगलाच काठीने प्रसाद देऊन आल्या पावली परत पाठवून दिले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कोविड सेंटरमध्येच दारू पार्टीचा डाव होता. पण, गेटवर तपासणीमुळे हा डाव पोलिसांनी उधळून लावला. एकूण मद्यपी कोविड रुग्णांना नेमकं सांभाळायचं तरी कसं, असा प्रश्न आता पालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours