पुणे, 07 जून : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबण्यात आला. पण यामध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंद आहे. खरंतर पुण्यासुद्धा अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या सर्व बाजारपेठा आणि दुकानं नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पण यामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. सर्व उपाययोजना राबल्या तरी पुण्यात कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणं मोठ्या संख्येनं समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7 कोरोना बधितांचा मृत्यू झाला तर 342 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात 259 जणांना डिस्चार्जही देण्यात आला तर 195 जण अजूनही गंभीर आहेत. त्यामुळे कितीही सूट दिली असली तरी नागरिकांना आपली काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या अत्यावश्यक कांमासाठीच बाहेर पडा आणि सुरक्षेचे नियम पाळा असं आवाहन पुणे पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
गेल्या 24 तासामध्ये पुणे पालिका हद्दीतही 290, पिंपरी चिंचवड परिसरात 29 तर छावणी भागात 15 आणि ग्रामीण भागात 8 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 413 झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours