मुंबई, 07 जून : गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपात्कालीन विभागानं दिली. या तक्रारींच्या आधारे अग्निशमन दलाकडून 17 गााड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाकडून तपासणी केल्यानंतर या कोणत्याही भागात गॅस गळती होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून अद्यापही तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेनं नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून गॅस गळतीचे कारण आणि स्त्रोत याचा शोध सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आजूबाजूच्या भागांमध्ये तपासणी सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours