मुंबई, 9 जून : चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरापर्यंत पोहोचवणारा देवदूत ठरला. राज्यपालांपासून अनेकांनी सोनूच्या कामाची दखल घेत कौतुक केलं. आता आणखी एक अभिनेता लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी पुढे आला आहे. 'खलनायक' चित्रपटाने पहिली ओळख निर्माण केलेला 'मुन्नाभाई' संजय दत्त मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खरा हिरो ठरला आहे.
कोरोनाव्हायरमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत डबेवाल्यांच्या हातचं कामच गेलं. गेले तीन महिने त्यांचंही काम बंद आहे. डबेवाल्यांना मदत करा, असं आवाहन संजय दत्तने सोशल मीडियावरू केलं आहे. संजय दत्त यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री कार्यालय, आदित्य ठाकरे यांच्यापासून अनेकांना टॅग करत आवाहन केलं आहे.
अनेक दशकं मुंबईकरांच्या पोटाची काळजी डबेवाल्यांमुळे मिटलेली आहे. आता ते संकटात आहेत, तर आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे.
कोरोनाव्हायरसची साथ सुरू झाली होती. त्या वेळी एप्रिलमध्येच संजय दत्त यांनी हजारो गरजू कुटुंबीयांच्या अन्नाची व्यवस्था केली होती. "सगळा देश संकटाशी सामना करत असताना आपणही आपल्याला शक्य होईल ते केलं पाहिजे. अशा वेळी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. मी फक्त माझ्याकडून जमतंय तेवढं करतो आहे", असं त्याने म्हटलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours