मुंबई:  राज्य मंत्रिमंडळातले वजनदार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवडत्या पर्यावरण विभागाचं नाव आता बदललं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.  पर्यावरण विभागाचे नाव बदलून आता 'पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग' असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पर्यावरणात होत असलेले बदल आणि त्याचा सामान्य माणसांवर होत असलेला परिणाम या सगळ्यांची दखल घेत हा मोठा बदल केल्याचं बोललं जातं आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनासोबतच पर्यावरण मंत्रालयही आहे. हा त्यांचा आवडीचा आणि पॅशनचा विभाग असल्याने तो खास त्यांच्याकडे देण्यात आला होता. हा बदलही त्यांच्याच सूचनेनुसार झाल्याची माहिती आहे. राज्य प्लॅस्टिक मुक्त करणं असो किंवा समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा विषय आदित्य ठाकरे यांनी या सर्व विषयांमध्ये मंत्रिमंडळात येण्याआधीपासूनच सक्रिय सहभाग घेतला होता.

या बदलामुळे आता पर्यावरण विभागाचं कार्यक्षेत्र वाढणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वतावरणाच्या बदलाचा अभ्यास आणि त्याचा परिणाम यावर मोठा प्रकल्प राबविण्याची त्यांची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours