पुणे, 05 जून : पुणेकरांची सगळ्यात आवडती ठिकाणं आजपासून खुली होत आहेत. गेले अडीच महिने बंद असलेली महात्मा फुले मंडई आजपासून सुरू होतं आहे. शिवाय महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग मार्केट आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय शॉपिंग स्पॉट हॉंगकॉंग लेन हेही सुरू होतं आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण या दरम्यान, नियमांचं काटेकोरपणे पालन होणं महत्त्वाचं आहे.
मास्क,सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टंसिंगबाबतचे सम विषम नियम पाळून या बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख बागाही सकाळी 6 ते 8 तसंच संध्याकाळी 5 ते 7 वाजता फिरण्यासाठी आणि व्यायामाकरता सुरू झाल्या. मात्र, तिथं लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांना परवानगी दिलेली नाही. यातही लागू केलेल्या सर्व नियमांचं पालन होणं महत्त्वाचं आहे.
कोरोना अनलॉक 1 च्या पॉलिसीनुसार गुरुवारी पुण्यातील केवळ 31 उद्याने तब्बल अडीच महिन्यांनतर सशर्त खुली करण्यात आली आहेत. पण त्यातही वेळेच्या मर्यादेसोबतच इतरही निर्बंध असणार आहेत. पुण्यात एकूण 204 बागा आणि उद्याने आहेत. उर्वरित उद्याने कोरोना कंटेंमेंट झोन उठल्यानंतरच खुली होणार अशी माहिती मिळाली आहे. थोडक्यात पहिल्या टप्पात फक्त जॉगिंग ट्र्रॅक म्हणून या बागांचा पुणेकरांना उपयोग करता येणार आहे.
काय आहेत निर्बंध?
-बागेत येणारअया प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
- 10 वर्षे वयोगटातील लहान मुले, गरोदर महिला, 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींना बागेत प्रवेशबंदी
- उद्यानात पान, तंबाखु खाणे आणि थुंकणे दंडणीय अपराथ असेल.
-उद्यानातील प्रचलित नियम नागरिकांस बंधनकारक राहतील.
-पुणेकरांना बागेत फक्त जॉगिंग करता येणार
-वेळ सकाळी 6 ते 8 तर सायंकाळी 5 ते 7
- सामुदायिक स्वरुपात उद्यानांचा वापर करता येणार नाही.
-नागरिकांनी उद्यानांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून वैयक्तिक व्यायाम, जसे की धावणे, चालणे या शिवाय इतर कोणत्याही बाबींना परवानगी नसेल.
- उद्यानांमध्ये गर्दी होणार नाही तसेच जिम साहित्य, खेळणी, हिरवळ, बेंचेस आदींचा वापर करता येणार नाही.
- नागरिकांकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सुरक्षारक्षकांनी घ्यावी.
Post A Comment:
0 comments so far,add yours