भंडारा, दि. २७ नोव्हेंबर:- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने आपल्या हक्काची जुनी पेन्शन मिळविण्याकरिता लढा तीव्र केला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष शिवराम घोती हे भंडारा जिल्ह्याचे संघटन बांधणी व कार्यकारिणी निर्मितीसाठी रविवार दिनांक २८ नोव्हेंबरला महिला डी. एड. कॉलेज, जिजामाता माध्यमिक विद्यालय , परिसर, सहकार नगर, भंडारा येथे येत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील डिसीपीएस/एनपीएस धारक शिक्षकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर ते गडचिरोली दौरा करून ते येणार आहेत. सोबतच राज्य पदाधिकारी, नागपूर विभागीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सभा रविवार २८ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता मिटिंग हॉल, जिजामाता माध्यमिक विद्यालय , महिला डी. एड. कॉलेज परिसर, सहकार नगर, भंडारा येथे होईल.
संघटनेची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच व महत्वाची सभा असून भंडारा जिल्ह्यातील सर्वच डिसीपीएस तथा एनपीएस धारकांनी आपल्या हक्काच्या लढ्यासाठी सभेला आवर्जून उपस्थित राहुन राज्य संघटना नेतृत्वाचे हात बळकट करावे असे आवाहन नागपूर विभागीय अध्यक्ष यशवंत कातरे, नदिम खान यांनी केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours