विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दि. २७ नोव्हेंबर:- नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय भंडारा येथे भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त दि २६ नोव्हेंबर २०२१ ला  "आमचे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमातंर्गत भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थांना समजावी. व घटनेतील मुलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी भारतीय संविधान  प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.  

सदर कार्यक्रम नुतन कन्या विद्यालयाच्या प्राचार्य सिमा चित्रिव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. 

त्यावेळी उपमुख्याघ्यापक निलु तिडके, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, पर्यवेक्षक सुरेखा डुंभरे उपस्थित होते.   भारतीय राज्यघटना हा लोकशाहीचा  पाया आहे. लोकशाही सक्षमीकरणासाठी तिचे महत्त्व तसेच भारतीय नागरिकांना घटनेने दिलेले अधिकार, हक्क त्यांचे कतर्व्य, अंमलबजावणी ह्याबाबत प्रचार हा प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन नुतन कन्या विद्यालयाच्या उपमुख्याघ्यापक निलु तिडके यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थीनीनी भारतीय संविधानावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहिणी मोहरील व प्रास्ताविक लिना चिचमलकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. विभा नानोटी यांनी मानले. 

    कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौ. स्नेहल सार्वे, मनिषा रहांगडाले, 

शिक्षक नदीन खान, कु. किर्ती दमाहे, रुपाली चौधरी, कु. नंदिनी निमजे, कु. अनिशा पुंडे तसेच शिक्षक- शिक्षिका व

विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours