७२ जनावरांना झाला लाभ

पशुसंवर्धन कर्मचा-यांची उपस्थिती

विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दि. २९ नोव्हेंबर:- भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मांडवी येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भंडारा व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २ माटोरा  यांच्या संयुक्त विद्यमाने वंध्यत्व शिबिर मांडवी येथे नुकतेच घेण्यात आले. 

     वंध्यत्व शिबिराचे उद्घाटन मांडवी येथील सरपंच सहषराम  कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. सविता चोले होत्या. त्यावेळी मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार, शहापूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रीती श्रावणकर, डॉ. रामकृष्ण निखारे, डॉ. डी डब्ल्यू दरवडे, सिल्लीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. माधवराव मानकर, मानेगाव डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. रामकृष्ण निखारे व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. 

     मांडवी येथील महाशिबीरात पहिल्या चार रेतनाला गर्भधारणेकरिता सुधारणा शिबीर, पशुवंध्यत्व रोग निदान औषधोपचार व जनजागृती शिबिरात जवळपास १७२ जनावरांची तपासणी करून वारंवार उलटणाऱ्या पशुवर औषधोपचार, मांजावर न येणाऱ्या पशुंची आरोग्य तपासणी व उपचार, गर्भधारणेची खात्री करणे. अशाप्रकारे १७२ पशुवैद्यकीय क्रिया करण्यात आली आहे. 

       कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विशाल भडके, गोपाल कंगाले, प्रविण वैद्य, बिसेन, मेश्राम, खुशाल बुजाडे, चेतन सोनुले, हिवराज माहुले, कैलाश भुरे, साकोरे, पडोळे, सार्वे तसेच पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी वर्ग व परिसरातील गोपालकांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours