पालांदुर चौरास येथील घटना, प्रियकरास अटक

विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दि. ३० नोव्हेंबर:- घरगुती सामान घेण्याकरिता आलेल्या प्रियसीस पालांदुर - अड्याळ रस्त्यावरील कब्रस्थानाचे मागील स्थळी नेवून चाकूने हाताची नस कापुन खून केल्याची घटना पालांदुर चौरास येथे सोमवार (दि.२९) ला उघडकीस आली आहे. विवाहास प्रेयसीसह तिच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने खून केल्याचे कबुली प्रियकराने दिल्याने पालांदुर पोलीसांनी प्रियसीच्या खूनास कारणीभूत ठरल्याने प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृतक प्रियसीचे नाव शिल्पा तेजराम फुल्लूके (२१) रा. मरेगांव तर प्रियकर आरोपीचे नाव नयन विश्वनाथ शहारे (१९) रा. पालांदुर असे आहे.मृतक युवती व आरोपी युवक एकाच शाळेत शिकलेले असल्यामुळे ओळख होती, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले, मूलगी विवाह योग्य झाल्याने तिच्या कुटुंबीयांकडुन स्थळ शोधण्यास सुरुवात झाली होती. घटनेच्या दिवशी तिला पाहण्यासाठी महागांव ता. अर्जुनी / मोर येथील एक युवक येणार असल्याने काही सामान खरेदी करण्यासाठी सकाळी ११ वाजता ती पालांदुर येथे आली होती. याबाबत प्रियकरास माहिती होताच भेटून अड्याळ रस्त्यावरील कब्रस्थानच्या मागे निर्जन स्थळी नेवुन धारदार चाकूने तिच्या हाताची नस कापुन खुन केला. प्रियसीचे कुटुंबीय तिचा विवाह करत आहेत. याची कुणकुण लागताच प्रियकर नयन शहारे आई सोबत मृतक हिला पाहण्यास गेला होता पण तो काहीच कामधंदा करीत नसल्यामुळे  विवाहास नकार दिला. नकार दिल्याने राग अनावर होवून तिचा खुन केल्याची कबुली दिल्याचे तसेच मृतक युवतीच्या आई शिला तेजराम फुल्लूके (वय ४०) हिचे फिर्यादी वरून पालांदुर पोलीसांनी प्रियकर नयन विश्वनाथ शहारे याचे विरूद्ध अपराध क्रमांक १६३/२०२१ कलम ३०२ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. घटना स्थळाला अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलिस अधिकारी अरून वायकर यांनी भेट दिली. आरोपी युवकास अटक केली असून तपास सहायक पोलिस निरीक्षक तेजश सावंत करीत आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours