जे.एम.पटेल  महाविद्यालयातील एन. एस. एस. व एन. सी. सी. च्या  विद्यार्थ्यांचा सहभाग

विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

 भंडारा, दिनांक २८ जानेवारी:- अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित  ‘७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ कार्यक्रम अंतर्गत २६ जानेवारी गणतंत्र दिनी सुर्यनमस्कारांनी राष्ट्रवंदना या विश्वविक्रमी कार्यक्रमात जे. एम. पटेल  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा चे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

     पतंजली योगपीठ, गीता परिवार, क्रीडाभारती, आयुष मंत्रालय, नई दिल्ली, नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशन, फिट इंडिया मोव्हमेंट, भारत स्वाभिमान न्यास, तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अंतर्गत १ जानेवारी २२ ते २० फेब्रुवारी २२ पर्यंत देशात रोज १३ सूर्यनमस्कार २१ दिवस घालून राष्ट्रवंदना करण्याचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या प्रकल्पात जे. एम. पटेल कॉलेज नी सुद्धा नोंदणी केली असून रोज सकाळी ६.१५ ला कॉलेज चे सर्व विध्यार्थी, प्राध्यापक योग प्रशिक्षक डॉ रमेश खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सुर्यनमस्कारांचा अभ्यास करीत आहेत.

    सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये आरोग्यविषयक जाणीव जागृती करणे हा आहे.

 प्रजासत्ताक दिनानिमित्त सुर्यनामस्कारांनी राष्ट्रवंदना या विश्वविक्रमी महोत्सवात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी योग प्रशिक्षक डॉ. रमेश खोब्रागडे,जिल्हा प्रभारी, भारत स्वाभिमान न्यास, भंडारा  यांच्या मार्गदर्शनात सूर्यनमस्कार केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम,फेसबुक व युट्युब वर करण्यात आले.

कार्यक्रमात covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर राखून सूर्यनमस्कार केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे, प्रा. प्रशांत वालदेव, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. जितेंद्र किरसान व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकइतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी- विद्यार्थी मोलाचे सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

1 comments so far,Add yours

  1. Hard Rock Hotel & Casino Reno, NV | Mapyro
    Free Shipping 광명 출장마사지 Across 50 States 강원도 출장샵 with Mapyro Real Time Gaming. A map showing Hard Rock 서귀포 출장안마 Hotel & Casino 고양 출장마사지 Reno, Nevada from United States 김제 출장샵 of America.

    ReplyDelete