शहीद काॅ. गोविंद पानसरे यांचा सातवा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून साजरा करण्याची हाक भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिले होती. त्या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व दलित अधिकार आंदोलन जिल्हा भंडारा च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी 2022 ला दुपारी एक वाजता राणा भवन भंडारा येथे शहीद दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी ञिरत्न बौद्ध महिला मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती विरांगणा बागडे होत्या तर भाकपचे जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्री विष्णुदास लोणारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर काॅ. वामनराव चांदेवार व कामरेड महानंदा गजभिये या मंचावर विराजमान होत्या. यांच्याहस्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व आम्ही सारे दाभोळकर पानसरे, कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, धर्मांध गोडसे वादी प्रवृत्ती मुर्दाबाद इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलतांना विष्णुदास लोणारे म्हणाले की, ज्या धर्मांध शक्तींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केली त्यांनीच त्याच पद्धतीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या केली. त्यांचा आम्ही निषेध करतो. तर काॅ. वामनराव चांदेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना काॅ. हिवराज उके म्हणाले की, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता ? ही पुस्तिका लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे कार्य व प्रतिमा प्रभावीपणे "रयतेचा राजा" म्हणून पुढे आणण्याचे ऐतिहासिक काम केले. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली आणि आज सात वर्षे लोटूनही त्यांचे मारेकरी व सूत्रधार अजून सापडले नाहीत हे शासन व तपास यंत्रणेचे अपयश असल्याचे ही काॅ.हिवराज उके यांनी सांगितले. संचालन कॉम्रेड गजानन पाचेे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येत महिला पुरुष उपस्थित होते त्यात प्रामुख्याने कॉम्रेड गणेश चिचामे, वाल्मीक नागपुरे, गौतम भोयर, ताराचंद आंबा घरे, दिलीप क्षीरसागर, श्रीमती उर्मिला वासनिक शीला शमकुवर, दर्शना गिरेपुंजे, शांत गणवीर, ज्वाला तिरपुडे, लीला बावणे, सारिका वानखेडे,अनिता बागडे, गीता तिरपुडे इत्यादींचा समावेश होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours