भंडारा : दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्याकरीता चौघा मित्रांनी संगणमत करून मित्राचीच हत्या केल्याची घटना भंडारा पोलीस स्टेशनअंतर्गत उघडकीस आली आहे.महेंद्र ऊर्फ टिंकु संतोष दहिवले, वय ३६ वर्षे रा. सुभाष वार्ड, बेला असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी भंडारा पोलीसांनी चार आरोपींना अटक केली असुन आरोपींमध्ये शुभम ऊर्फ आर्यन नंदकिशोर मंदुरकर २१ वर्ष, रा. श्रीकृष्ण वार्ड, भंडारा, निशाण ऊर्फ अम्मु अनिल कटकवार १९ वर्षे, रा. चांदणी चौक,दिपांशु कर्फ बिट्ट शुभाष शहारे, २० वर्ष, रा. डॉ. आंबेडकर वार्ड, भंडारा व हेमंत ऊर्फ भांजा पवन पांडे, ३० वर्ष, रा. टप्पा वार्ड, भंडारा यांचा समावेश आहे.
मृतक महेंद्र ऊर्फ टिंकु संतोष दहिवले याला व्यसनाची सवय असुन तो बेला येथे स्वतःच्या घरी एकटाच राहत होता. १० मार्च २०२२ रोजी मृतक हा त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर पडला परंतु तो घरी परत न आल्यामुळे मृतकाच्या घरच्या किरायेदाराने त्याच्या नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो कुठेही मिळून न आल्याने १४ मार्च २०२२ रोजी भंडारा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवियात आली.
प्राप्त तक्रारीच्या अनुशंगाने भंडारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना प्रकरणात गंभीर घातपाताचा संशय आल्याने त्यांनी मृतकाच्या शोधकामी पथक तयार करून त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान मृतकच्या संशयास्पद मित्रांची माहिती काढुन त्यांची चौकशी केली असता मित्रांनी काहीही माहिती नसल्याचे सांगीतले.मात्र पोलीसांनी तपासाची गती कायम ठेवली. अखेर पोलीसांच्या तपासादरम्यान मृतकाच्या मित्रांवर दाट संशय आल्याने त्यांची कसुन चौकशी केली असता आरोपींनी सर्व हकीकत सांगीतली.
९ मार्च २०२२ रोजी रात्री मृतक महेंद्र हा आपल्या घरी एकटाच असताना आरोपी चारही मित्र त्याचे घरी दारु पिण्याकरीता गेले असता दारूच्या नशेत काही कारणावरून मृतकाचे अन्य मित्रांसोबत भांडण झाले. त्या भांडणाचा वचपा काढण्याकरीता आरोपी मित्रांनी दिनांक १० मार्च २०२२ चे रात्री मृतक महेंद्रच्या घरी जाऊन त्याला विश्वासात घेऊन फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्याला दुचाकीवर बसवुन कारधा येथील वैनगंगा नदीच्या जुन्या पुलावर नेले. तिथे मृतकाला जबर मारहाण करीत त्याच्यावर तलवारीने वार करुन त्याला गंभीर जखमी अवस्थेत कारधा येथील जुन्या पुलावरुन नदीत ढकलुन दिले. आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह बासाचे काठीने पाण्यात बुडविल्याची कबुली आरोपींनी पोलीसांना दिली. आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदर कागगिरी पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती , उपविभागीय पोलीस अधिकारा संजय पाटीलयांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे आणि त्यांचे अधिनस्थ तपास पथकातील पोउपनि मंगेश नागरगोजे, पो.हवा. मौजीभाई शहारे, पो.ना. संदीप ठवकर, पो.ना. प्रशांत भोंगाडे, पो.ना. साजन वाघमारे, पो. अं. हेमकृष्ण वलथरे, पो.ना. अजय कुकडे, पो.अं. नरेंद्र झलके, पो.ना. बुरडे यांनी कामगिरी पार पाडली .पुढील तपास सपोनि प्रशांत केदार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours