विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दिनांक ३१ मार्च:- श्री कालीकमली वाले महाराज, श्री दादाजी धुनिवाले देवस्थान भिलेवाडा (कारधा) यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा नविन वर्षानिमीत्त ( गुढीपाडवा) व श्री महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन दि.१ एप्रिल २०२२ रोज शुक्रवारला जागृतीचा कार्यक्रम व दिनांक २ एप्रिलला दुपारी ३ वाजता गोपालकाला व ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील भाविकांनी कोरोना कोव्हिड-१९ चे नियम पाळुन कार्यक्रमाला उपस्थित राहून गोपालकाला व महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दादाजी धुनीवाले देवस्थान भिलेवाडाचे विश्वस्त प्रतिकुमार टांगले व विश्वस्त पंचक्रमेटीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours