विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रमाला सायबर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. निलू तिडके, शिक्षिका सौ. सुषमा कुरंजेकर उपस्थित होते.
सायबर क्राइम बाबत जगजागृती करीत असतांना सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी सोशल मीडिया हाताळतांना तसेच ऑनलाइन खरेदी, इंटरनेट मोबाइल व्यवहार, येणारे फेक कॉल, फेक लॉटरी मेसेज, हनी ट्रैप, लहान मुलांची फ्री फायर गेम याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours