भंडारा - मौजा खमाटा टाकळी येथे नवीन वर्षानिमित्त जलसा कार्यक्रमाचे आयोजन करुन गोंधळ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आलेे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रुपाली भेदे यांच्या हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे हे होते. याप्रसंगी नगरसेविका चंद्रकलाताई भोपे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कोठीराम पवनकर, अन्यायग्रस्त शेतकरी संघर्श समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, दिनेशकुमार गायधने, पुनाजी गायधने उपस्थित होते. यावेळी  भारतीय राज्य घटनेनी दिलेल्या समान अधिकारानुसार सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पालन करुन समाजात एकोपा निर्माण करावा त्यातच देषाचे प्रगती होईल असे मत विष्णुदास लोणारे यांनी मांडले. सतत होणाÚया नापिकीमुळे व सद्यस्थितीत शेतकÚयांची दैनंदिन अवस्था पाहून त्यांचेकडे आर्वजून लक्ष देण्याचे कार्य शाशनाने करावे असे चंद्रशेखर भिवगडे म्हणाले. यावेळी रतिराम भेदे, सतीश राघोर्ते, योगेश गायधने, जयंता आस्वले, राजकुमार राघोर्ते, बबलु गायधने, रुपचंद पवनकर, राधश्याम गायधने, विनोद भोपे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours