भंडारा - पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत उमरी येथील सुमेध मारोती मेंढे यांच्या घरी गेल्या सहा महिन्यापासून दिवसाढवळया आपोआप लोखंडी आलमारी चालणे, आपोआप भांडे चालणे, आपोआप तेलाचे पाणी होणे, दप्तरात पाणी जाणे, साफ दिसणे व गायब होणे अशा विविध घटना घडत असल्यामुळे सुमेध मेंढे व त्यांचा कुटूंब अंधश्रध्देच्या आहारी जाण्याचा प्रकार सुरु झाला. त्यांनी गावाजवळील लाखांदुर येथील देवी अंगात आणणाÚया भक्तीनिकडे आकत लावले, मासळ येथील भक्तीनीकडे भाग पाहिले, इसापूर येथील भक्तीनीकडे भाग पाहिले, तही येथील महाराजाकडे गेले यातील दोघांनी सुमेध मेंढे यांच्या घरी जिंद आहे, मुंज्या आहे असे सांगितले तर दोघांनी करणी केली आहे असे सांगितले मात्र प्रकार बंद झाले नाही. म्हणून गावातील पोलीस पाटील सावरबांधे यांच्याकडे मेंढे गेले. त्यांनी सर्व परिस्थिती गावातील पोलीस पाटलांपुढे मांडली. पोलीसांकडे तक्रार देण्याचे ठरविले. परंतु सदर प्रकरण पोलीसांत चालत नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे सदर घटना विविध  वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आल्या. प्रकाशित वृत्तपत्रातील बातम्याची दखल घेवून महाराष्ट्र अंनिसचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, प्रकाश नाकतोडे आणि पुरुषोत्तम गायधने यांनी पोलीस अधिक्षक भंडारा यांना विनंती पत्र लिहून उमरी गावात भेट दिली. त्यावेळी सुमेध मेंढे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर हर्षल मेंढे वय 11 वर्ष आणि मुलीची भेट घेण्यात आली व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतुन सदर प्रकार कोणत्याही दैवी चमत्कार नाही. कोणीही जादुटोणा करणी केलेला नाही तर त्यांच्या घरी कोणत्याही प्रकारे जिंद अथवा मुंज्या नाही  हे सर्व प्रकार मानवी कृत्याचे प्रकार असल्याचे निदर्शनास आले. असे प्रकार वारंवार भंडारा जिल्हयात व संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच घडत असतात यामागे प्रत्येकवेळी मानवी हात असल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे जनतेने घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही. महाराष्ट्र शाशनाच्या निर्देशानूसार जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती आहे. त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी भंडारा असून सचिव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सदस्य पोलिस अधिक्षक आणि षिक्षणाधिकारी हे आहेत. मात्र सदर समिती कागदावरच असल्याचे मत विष्णुदास लोणारे यांनी सांगितले. समाजात जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि हत्या होतात तेव्हा तेव्हा मात्र पोलीस विभागालाच धारेवर धरले जाते. म्हणून या विभागाने समाज जागृतीच्या कार्यासाठी पुढाकार घ्यावा अशी  महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मागणी आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours