भंडारा- भारतातील मुस्लीम समाजातील पहिल्या शिक्षिका नावारुपास असलेल्या फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त एम.ए.के. आझाद नगर परिषद उर्दु हायस्कूल भंडारा येथील सहाय्यक शिक्षिका  निशात खान यांचा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मअंनिस चे जिल्हा अध्यक्ष हर्षल मेश्राम होते. कार्यक्रमाला डॉ. संजय मानकर  माजी मुख्याध्यापक मकबूल वारसी, राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, नसीम बाबु खान, डॉ. मोइना जमाल, रजया वारशी, साइना इरम, सुरज परदेषी होते. यावेळी डॉ. संजय मानकर यांनी सांगितले की, फातिमा शेख या मुस्लीम समाजातील पहिल्या महिला शिक्षिका असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. त्यांनी मुस्लीम समाजात शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून सतत प्रयत्न केले . याप्रंसगी एम. ए. के.आझाद उर्दु हायस्कूल शाळा भंडारा येथील सहा. शिक्षिका निशात खान यांचा अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र पुस्तिका व पुष्प देवून हर्षल मेश्राम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours