विष्णु दास लोणारे सामाजिक कार्यकर्ता

 भंडारा जिल्ह्यात अवैध रेती चोरी, दारू विक्री, सट्टा पट्टी, जोरात सुरू....... भंडारा जिल्हा नदी काठावर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदी ,सूर नदी, उतरवाहिनी नदी, अश्या अनेक नद्यांनी व्यापलेला भंडारा जिल्हा हा धानपिकीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो .मात्र आता सध्या भात पिकाच्या व्यवसाय परवडत नाही खर्च जास्त वाढलेला आहे मजूर मिळत नाही म्हणून धाण पिकाच्या व्यवसाय कडे अनेक लोकांनी दुर्लक्ष केल्याची दिसून येते त्यामुळे हा व्यवसाय कमी झाला असून कमी वेळात जास्त पैसा मिळावा हा उद्देश पुढे ठेवून अनेक नागरिकांनी शेती उपयोगासाठी म्हणून ट्रॅक्टर खरेदी केले. त्यात अवैध रेती चोरीचा व्यवसाय सुरू केला यात नागपूर कामठी अशा शहरातील व्यापाऱ्यांनी उडी घेतली चोरीच्या व्यवसायाला पाठिंबा दिला . त्यामुळे अवैध रेती चोरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला,आणि यात अधिकारी सुद्धा सामील झाले आहेत. काही अधिकारी व कर्मचारी मालामाल झाले आहेत त्याच्या पगारापेक्षा रेतच्या व्यवसायातून मिळणारी रक्कमच त्यांच्यासाठी अधिक मोठी आहे. या व्यवसायात अधिकाऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पैसा जातो त्यामुळे अवैध रेती चोरीचा धंदा भंडारा जिल्ह्यात नंबर एकचा बनलेला आहे. अधिकाऱ्यांना महिन्याचे पैसे गेले नाही की, धाड मारून ट्रॅक्टर वाल्यांना ट्रक वाल्यांना पकडले जाते. हप्ता गेला की जैसे थे अशीच लंका पुढे असते. हे विचित्र चित्र भंडारा जिल्ह्यात अनेक वर्षापासून सुरू आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात नदी काठावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू काढली जाते ती दारू शहरात आणून विकली जाते दारू विकणाऱ्या पेक्षा व पिणाऱ्यापेक्षा गब्बर श्रीमंत अधिकारी आणि कर्मचारी बनले आहेत. लोक ओरडले की थातूरमातूर कारवाई केली जाते पुन्हा जैसे थे वैशी परिस्थिती आहे. तिसरा व्यवसाय सट्टापट्टी हा व्यवसाय गल्लीपासून दिल्ली पर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू आहे या व्यवसायावर सुद्धा कुणाचेच लक्ष नाही अनेक कुटुंब उध्वस्त झाले घरचे ताटे वाटे विकले मात्र सट्टा पट्टी आजही भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लोकांनी काय करावा काही कळत नाही. सुचत नाही अधिकाऱ्याकडे तक्रार केली तर अधिकारी म्हणतो आमच्याकडे अधिकार नाही लोकांनीच पुढे यावा लोकांनी जर पुढे आले तर मग अधिकाऱ्यांनी काय करावा असा प्रश्नन निर्माण होतो. मंत्री संत्री खुर्ची टिकवण्याच्या आनंद घेत आहे त्यांना मताची गरज आहे जनतेच्या जीवाची काही घेणे देणे नाही प्रत्येक आमदाराला वाटतो आपली खुर्ची कायम असावी आणि आपल्या घरी पैशाची भरभराट येत राहावं.त्यात लोकप्रतिनिधी मस्त आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात अवैध रेती, अवैध दारू ,आणि सट्टापट्टी जोमात सुरू जनतेचा विचार करून याकडे संबंधित अधिकाऱ्याने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे मोबाईल नंबर 92 26 90 37 33

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours