भंडारा/गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील धानोरी गावातील महेश कटरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.
दैनंदिन दौऱ्यावर असता शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. सध्या पावसाळा सुरू असता शेतकऱ्यांच्या भात पिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे, भात पिकाची रोवणी सुरू आहे. अशातच काही महाराष्ट्र सरकारने विजेचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास शेतकऱ्यांना देणे सुरू केले, किती त्रास सहन करावा लागत आहे, ना बरोबर १२ तास विज शेतकऱ्यांना मिळत, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यानं समोर उभा नेहमीच असतो. दिवसा आणि रात्री पण विद्युत पुरवठा बरोबर होत नाही, शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकरी पिकला पाहिजे.
शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले पाहिजेत, यासाठी मी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी नेहमीच महिला मंडळी सोबत शेतात राब-राब राबत असतात. शेतकऱ्यांच्या शेतावर जाणारे रस्ते बरोबर नाहीत आजही चिखलातून जावे लागते. पायांना मोठया प्रमाणात काटे रुतलेले आहेत.किती वेदना शेतकऱ्यांना आहेत. या महायुतीच्या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजणार नाहीत.सडक अर्जुनी तालुक्यात दैनंदिन दौरावर असता त्या दरम्यान धानोरी ता.सडक अर्जुनी येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात पिकाची रोवणीची पाहणी केली, आणि स्वतः शेतातील काम करणाऱ्या महिलांसोबत भात पिकाची रोवणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे केली. सोबत श्री.दिलीपजी बन्सोड जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी गोंदिया, पदाधिकारी, कार्यकर्ते, धानोरी येथील शेतकरी उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours