भंडारा जिल्ह्यातील रेतीचे अवैध उत्खनन, म्यागनीज चोरी, जुगार, इग्स, बनावटी दारू व विविध अवैध कामाचे बाबतीत जनते रोष आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदी, सूर नदी, बावनथडी नदी, चुलबंद नदी, वाघ नदी, यातील घाटावरून, नदीपात्रातून सर्रास अवैध रेतीचे उत्खनन केले जाते. मोठ्या प्रमाणावर म्यागनीज चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. जुगार, इग्स, बनावटी दारू मुळे जिल्ह्यातील युवकांवर त्याचे वाईट परिणाम होत असून भीतीचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात तयार झाले आहे. करोडोचा महसूल डुबविल्या जातो. याकडे सर्व अधिकारी नेहमीच कान्हा डोळा करीत असतात. ट्रक व ट्रक्टर, जेसीबी, च्या साहाय्याने रेती उपसा करून वाहतूक केली जाते. रस्त्याने ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने अजूनही काही रेती घाटाचे लिलाव केले नाही, त्यामुळे अनेक रेती माफीया या व्यवसायात सक्रिय झाले आहेत.


रोज रात्री व दिवसा अवैधरित्या रेतीचे उत्खनन केले जात आहेत. विना नंबर प्लेटच्या बऱ्याच रेती माफियांच्या


गाड्‌या आहेत. तरीपण वाहतूक विभागाचे त्याकडे लक्ष नसल्याचे दिसते. आर्थिक देवाण घेवाणीमुळे संबंधीत अधिकारी कारवाही करत नसल्याची चर्चा दोन्ही जिल्ह्यात आहे. संबंधीत अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने रेती माफिया सक्रिय झाले असून त्यांची दहक्षत निर्माण झाली आहे. गुन्हेगारी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरी व ग्रामीण भागात रस्त्याला ओव्ह लोड वाहतुकीमुळे खड्‌डे पडले असल्याने लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. घरकुल लाभार्थ्यांना आजही पुरेशी रेती मिळत नाही. अनेकदा लेखी अर्ज करून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना पाहिजे ती रेती दिल्या जात नाही. आता पावसाळा सुरू होत असल्याने. अवैध रेतीचे उत्खनन थांबविल्या गेले पाहिजे. महसूल विभाग, पोलिस विभाग, खनिज विभाग, वाहतूक विभाग यांनी तात्काळ अवैध रेतीचे उत्खनन थांबवून रेती माफियांवर तातळीने कारवाई करावी मांगणी डाक्टर प्रशांत ‌पडेळे खासदार मोहन पंचभाई जिव्हा अध्यक्ष कांग्रेस जयश्री बोरकर महीला अध्यक्षा‌महीला कांग्रेस मनोज बागडे व सव कार्यकर्ता निवेदन देतांनी



 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours