मुख्यमंत्रांचा लोकशाहीवर विश्वास नाही

संपादिका: सुनीता परदेशी 

भंडारा : जिल्ह्यात यावर्षी धान पिकावर तुडतुडा या किडीने आक्रमण केले होते, त्यांमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, डिसेंबर महिन्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व  काँग्रेसने शेतकऱ्याना नुकसानभरपाईची मागणी केली होती, परंतु राज्य सरकारने मदत केली नाही. दरम्यान, भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने आपली जागा जिंकून यावी यासाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. व मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैर वापर करून शुक्रवार दि 25/5/2018 ला जिल्हाधिकारी यांना आदेश दिले. नंतर मा जिल्हाधिकारी यांनी रात्री उशिरा आदेश काढून कोषागार अधिकाऱ्यांना शेतकऱऱ्यांच्या खात्यावर rtgs करण्याचे  आदेश दिले आहे. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच 11.15 वाजता कोषागार अधिकाऱ्याला घेराव घालून विरोध केला. त्यानंतर कोषागार अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला.त्यावेळी भंडारा तहसील कार्यालयाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित  होते. राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात निवडणूकी दरम्यान आचारसाहिते चे उल्लंघन केले आहे. तसेच पालघर येथील पोट निवडणुकीत सुधा  मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले की या निवडणुकीत सांम दाम दंड भेद वापरा बाकी मी बघतो. अशी बातमी ABP maza या मराठी वृत्त वाहिनी वर प्रकाशित करण्यात आली आहे.अश्या प्रकारे दडपशाहीचे राजकारण करण्यात येत असून मुख्यमंत्रांचा लोकशाहीवर विश्वास नाही असे दिसून येते. म्हणून या निवडणुकीत जनताच आता जागा दाखवेल अशी चर्चा जनसामान्यांच्या सुरू आहे.


सम्बंधित विडियो देखे- Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours