भंडारा-गोंदिया, 26 मे : भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीतही पालघप्रमाणंच राजकारण रंगलं आहे. तुडतुड्या रोगाच्या नुकसान भरपाईचे ११ कोटी रुपये सुट्टीच्या दिवशी बँका उघडून वाटण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. भाजपकडून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे.
मदतीचं वाटप करायचंच होतं तर मग सहा महिन्यांपासून सोमवार ते शुक्रवारपर्यंत का नाही वाटली, असा सवालही जयंत पाटलांनी उपस्थित केलाय. दरम्यान, या प्रकाराचे दस्ताऐवज न्यूज18 लोकमतच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे राजकारण अजून कसं रंगणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours