मुंबई, 11 जून : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा दिवस परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्याची जबाबदारी आता तीन मंत्र्यांवर देण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यात महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करण्याचा संकल्प केलाय आणि त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना प्रभारी मुख्यमंत्रीपद मिळाल्याची चर्चा आज राज्यभर होती त्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, शनिवारपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते वॉशिंग्टन, सेन फ्रांसिस्कोमध्ये अनेक शहारांना भेट देऊन तेथील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, 'अॅमेझॉन' समुहातर्फे मुख्यमंत्र्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours