नाशिक, 11 जून : भिडे गुरूंजींनी नाशिकच्या व्याख्यानादरम्यान, एक चमत्कारीक विधान केलं आहे. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला आहे. आंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, अहमदनगरचा उल्लेख 'अहमदनगर' नव्हे तर 'अंबिकानगर' असा करण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. तसंच सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल असंही ते म्हणाले. ते अहमदनगरच्या टिळक रोड इथं झालेल्या सभेत बोलत होते.
रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी 'हिंदवी स्वराज्य खडा पहारा' तुकडी तयार करण्याची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली. तसंच हिंदूंचे खरे शस्त्रू भारतातले सुशिक्षीतच असल्याचं ते म्हणाले.
या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे काल कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली. पण सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान या सभेत भिडेंनी कार्यकर्त्यांना व्यसनमुक्तीचीही शपथ दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours