भंडारा/नागपूर 6 जून
शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून भंडार्‍याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली केली असून त्यांच्या जागी शंतनू गोयल हे आता भंडार्‍याचे नवीन जिल्हाधिकारी असतील. दिवसे यांची नियुक्ती नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे. गोयल हे यापूर्वी नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते.
भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. सूर्यवंशी यांची बदली ठाण्याला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांच्या जागेवर ए. एन. करंजकर यांची भंडारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सोबतच ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त एस. एल. यादव यांची बदली नागपूर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर करण्यात आली आहे. नागपूर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची यापूर्वीच गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours