रीपोर्टर-: हर्षिता ठवकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बगावत करत भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची माळ पडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा दारुण भराभव केला. या विजयाचे शिल्पकार म्हणून नाना पटोले यांच्या गळ्यात आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची माळ पडणार असल्याचे कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते लगेच चिडतात, तसेच शेतकऱ्यांच्या , बेरोजगाऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या विषयावर मोदी सरकार गंभीर नाही. भारतीय जनता पार्टीने स्वतः दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही. अशी जाहीरपणे टीका करून खळबळ उडवून देत आणि त्यानंतर सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा समाचार घेणारे भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत मोदी सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातील पहिलं बंड केलं होतं.

हे बंड यशस्वी झाल्यानं आता महाराष्ट्र कॉंग्रेसची सुत्रं नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours