रेपोर्टर -:अजय मेश्राम
।भंडारा ।६ जून
तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सत्तेत आलेल्या भाजपच्या भंडारा नगराध्यक्षांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांशी संगनमत करून न्यायालयात सुरू असलेल्या डम्पींग यार्डचे कंत्राट मनमर्जीतील कंत्राटदारांना देण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून याबाबत विचारणा केली असता नगराध्यक्षांकडून अन्य कंत्राटदारांना खबरदार, आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही अशी धमकावणी केली जात असल्याचा आरोप पत्रपरिषदेतून कंत्राटदार टाटा लांजेवार यांनी केली आहे.
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वरठी रस्त्यावर असलेल्या डम्पींग यार्ड बनविण्यात आला आहे. या डम्पींग यार्डचे कंत्राटबाबत ३०८ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्याकडे तीन महिन्यांपासून न्यायप्रविष्ट आहे.
परंतु यात नगराध्यक्षांना स्व:हिताकरिता जिल्हाधिकाऱ्याच्या न्यायाची प्रतिक्षा न करता डम्पींग यार्डच्या कामासाठी कंत्राट काढण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. नियमानुसार कमीत कमी दर असलेल्या निविदा धारकाला टेंडर देण्यात येणारा नियम असताना देखील ३ टक्क्याने जादा दर असणाNया स्वत:च्या मर्जीतील कंत्राटदारांना डम्पींग यार्डचा कार्या अध्यादेश कोणत्या आधारावर देण्यात आला. तसेच परंतु या निविदेमध्ये वर्ग-२ च्या नोंदणीची आवश्यकता नसताना देखील अनावश्यक अटी व शर्तीं लादून निविदा प्रक्रियेतील स्पर्धा संपुष्टात आणली.
एवढेच नाही तर, या डम्पींग यार्डच्या कामावर नगराध्यक्षांनी आपल्या सनी कन्स्ट्रक्शन कंपनीची वाहने लावून यातून मोठा मलिदा खाण्यासाठी आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला सदर निविदा मंजुर करण्यात आली असून याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याना व इतर नगरसेवकांना विचारणा करण्यात आली असता त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सांगून नगराध्यक्षांकडून अन्य कंत्राटदारांना धाक दाखविण्यात येत असून माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही’’ अशा प्रकारे धमकविल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours