औरंगाबाद, 29 जून : केंद्राप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला राज्यातही वाटा मिळाला पाहिजे, रिपाईला महाराष्ट्रातही मंत्रिपद मिळायला हवं, अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी गुरुवारी औरंगाबादमध्ये व्यक्त केली.
महामंडळांवर नियुक्ती होण्याबाबतीत उशीर झाला आहे पण याबाबत मी एक-दोन दिवसांतच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या सत्तेत रिपाईला वाटा मिळाला पाहिजे. एकतर महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाईच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केली.
आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही महामंडळांमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झाले पाहिजे असंही ते म्हणाले. मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये आयोजित रिपाइंच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री आठवले शहरात आले होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्रात आरपीआयला एक एमएलसी आणि एक मंत्रीपद मिळावे. मला केंद्रात मंत्रीपद मिळाले, महाराष्ट्रामध्येही आरपीआयला एक मंत्रिपद मिळाले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता याबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यातून काय निर्णय घेण्यात येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours