दत्तकग्रामातच मुख्यमंत्री नापास.
समस्याग्रस्त सावळेश्वरवासीयांची जिल्हाधिकारी कार्यालयावर देवानंद पवार यांच्या नेतृत्वात दिली धडक.
-खासदार भावना गवळींनाही विचारला जाब.
यवतमाळ : मुख्यमंत्र्यांचे दत्तकग्राम असलेले सावळेश्वर विविध समस्यांनी ग्रासले आहे. लोकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी ग्रामस्थांचे नेतृत्व केले.
मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपुर्वी उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर या गावाला दत्तक घेतले आहे. मात्र गावात विकास तर सोडाच पण मुलभूत गरजाही पुर्ण होत नाहीत. यामुळे त्रस्त होऊन ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दरम्यान खासदार भावना गवळी यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांनी मोर्चा तिकडे वळविला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खासदार गवळी यांना घेराव घालुन प्रश्नांची सरबत्ती केली. दत्तकग्राम असूनही गावात प्राथमिक गरजा पुर्ण होत नाहीत. लोकप्रतिनीधी गावात फिरकतही नाहीत तुमच्या पक्षाची सत्तेत भागीदारी आहे त्यामुळे यासाठी तुम्हीही उत्तरदायी आहात असेही ग्रामस्थ म्हणाले. आम्हाला मजुरी बुडवून व भाकरी बांधुन एवढ्या दुर केवळ आमच्या समस्या मांडण्यासाठी यावे लागत असेल तर दत्तकग्राम असल्याचा काय उपयोग आहे असा खडा सवाल विचारून सावळेश्वर येथिल महिलेने विचारून खासदारांना निरूत्तर केले.
काही महिन्यांपुर्वी सावळेश्वर येथिल माधव रावते या वृद्ध शेतकरयाने स्वत:चीच चिता रचून आत्महत्या केली होती. त्यावेळी काही लोकप्रतिनीधी व प्रशासन हि आत्महत्या नसून अपघात आहे हे सांगण्यासाठी प्रकर्षाने पुढे आले होते. मात्र ती तत्परता या गावच्या समस्या सोडविण्यासाठी का दाखविल्या गेली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
झोपडपट्टी ते सावळेश्वर रस्ता नसल्याने विद्याथ्र्यांना व ग्रामस्थांना चिखलातून जावे लागते. ढाणकी ते सावळेश्वर रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाण्याची समस्या, शौचालयाचे रखडलेले अनुदान, गावात अनेकांना घरकुल योजनेचा न मिळालेला लाभ, केवळ चारच शिक्षकांवर वर्ग १ ते ७ ची जबाबदारी, गावातून एकही पांदण रस्ता नाही तसेच स्मशानभुमीला शेड सुद्धा नाही. यासह अनेक अडचणींनी सावळेश्वर गावाला ग्रासले आहे. दोन वर्षांपुर्वी मुख्यमंत्र्यांनी हे गाव दत्तक घेतल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र त्याचा कोणताही फायदा गावाला झाला नसल्याने ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवरही रोष आहे.
यावेळी विवीध मागण्यांचे निवेदन शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिका-यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सुर्यवंशी,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शंकर कदम,शहर अध्यक्ष आकाश पवार,माजी सरपंच सिद्धार्थ पोपुलवार, मारोती काळबांडे, रणजीत काळबांडे, दिपक रावते, रवि काळबांडे, तानाजी बावणे, विष्णु कांबळे, दिपक काळबांडे, चंद्रमणी काळबांडे, अनिल बावणे, सुरेश काळबांडे, निलेश कांबळे, ह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours