भंडारा : मुंबई-हावडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्किंग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तहसील तथा पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची ही वाहने आहेत. महामार्गच पार्किंग झोन बनल्याने, समस्या अधिकच बिकट बनली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. त्रिमुर्ती चौक परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पंचायत समिती कार्यालय , तहसील कार्यालय व तथा चार पेट्रोलपंप आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ही सर्व कार्यालये एकमेकांसमोर वसली असल्याने रहदारीत अजून वाढ झाली आहे. तहसील कार्यालयात पेड पार्किंग असल्याने पंचायत समिती तथा तहसील कार्यालयात येणारे काही नागरिक चक्क महामार्गच्या कडेला च वाहने पार्क करतात.
आधीच महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम रखडून असल्याने रस्ता अरूंद आहे. त्यातही रस्त्याच्या कडेला वाहने पार्क होत असल्याने रहदारील अडथळा निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते.
अपघाताची शक्यता
तहसील कार्यालयाचा परिसर प्रशस्त आहे. महसुली कामांसाठी अनेक लाभार्थ्यांसह विद्यार्थी व पालक येथे येत असतात. तहसील कार्यालयाच्या महामार्गाला लागून असलेले मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या स्थितीत आहेत. अश्या स्थितीत अर्जनविस बसत असलेल्या ठिकाणाहून ते कार्यालय परिसरात वाहन पार्किंग करायचे असेल तर शुल्क द्यावे लागते.
शुल्क न देणारे वाहन चालक सदर वाहने महामार्गावरच वाहने लावीत असतात. आधीच महामार्गाचे विस्तारीकरण झालेले नसल्याने या समस्येत भर पडली आहे. या गंभीर समस्येकडे वाहतूक शाखेने किंवा तहसील कार्यालय प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणीही नागरिकांकरवी होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours