भंडारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. भंडारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा, ओबीसी, धनगर व मुस्लीम आरक्षण यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे, यशवंत भोयर, भगवान बाभरे, सर्फराज खान, माजिद खान, संजय बांते, अनिल कढव, विलास मरसकोल्हे, गणेश नंदनवार, संघर्ष शेंडे, मुशीर अहमद, गुणवंत भुरे, इरफान वारशी आदी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours