रिपोर्टर - हर्षिता ठवकर
▪एस.टि.चालकाची मनमानी▪
अड्याळ-सन 2016 ला अड्याळ बसस्थानक परिसरातील वाढलेल्या अतिक्रमनाने नाहक राम या बालकाचे टिप्परच्या धडकेने मृत्यू झाले.त्यावेळी शासनाने तात्काळ दखल घेऊन अतिक्रमन काढले व रत्याला दुभाजक दिले.मात्र एस टि महामंडळाचे चालक दुभाजकांचा उपयोग न करता मिळेल त्या बाजूने बस घेऊन जातात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता बळावली आहे.
      वृत असे कि,अड्याळ बसस्थानक परिसरात फुथपाँट विक्रेते व व्याप्याऱ्याची रस्यावर आलेले अतिक्रमण हि डोकेदुखी झाली होती. या दरम्यान 22 एप्रिल रोजी राम या बालकाला टिप्परने धडक देऊन जागीच ठार केले.तेव्हा शासनाची झोप उडाली व रत्यावर आलेले बसस्थानक तोडून रत्यावरील अतिक्रमण हटविले.
    त्यावेळी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने कर्तव्याची जबाबदारी दाखवून रस्ता दुभाजक व रत्यावरील खड्डेबुझविले व वहतुक पोलीस यांची ड्युटि लावून जामर व्दारे कारवाई करण्याची शक्ती लावल्याने सुरळित वाहतूक चालत होती सदर बसस्थानकावर पंचकोषितील विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असल्याने व आजमितीला पूर्वस्थिती निर्माण झाल्याने.व बस  चालक दुभाजकांचा उपयोग करित नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी सबंधीतांनी तात्काळ सदर समस्येवर लक्ष केंद्रित करून मोठा अपघात होण्याची वाट न पाहता समस्या मार्गी लावावी असी मागनी सामाजिक कार्यकर्ते देवा भुजाडे , सुभाष कुबडे,कलीलशेख,राहुल खोब्रागडे राजु मुरकुटे आदिनी केली आहे.

देखे विडियो-


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours