नागपूर : देशात पहिल्यांदाच नागपुरात उसापासून तयार होणाऱ्या १०० टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या ग्रीन बसेसची सेवा बंद करण्याचा निर्णय स्कॅनिया कंपनीने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारी इथेनाॅलवर चालणाऱ्या २८ ग्रीन बसेस बंद करण्याचा आंतरराष्ट्रीय कंपनी फोक्सवॅगनच्या स्कॅनिया कंपनीने घेतला आहे. महानगर पालिकेने १८ टक्के जीएसटी, एस्त्रो अकाऊंट म्हणजेच वर्षभराचे भाडे एका बँक खात्यात सुरक्षा ठेव म्हणून जमा करणे आणि  सुसज्ज डेपो उपलब्ध करणाच्या मागणीसाठी स्कॅनियाने मनपाला पत्र पाठविले होते.  ग्रीन बससंदर्भात २३ आॅगस्टला दिल्लीत बैठक घेऊ तोपर्यत ही सेवा सुरू ठेवण्यास नितीन गडकरी यांनी स्कॅनियाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. पण स्कॅनियाने बसेस सुरू करण्यास नकार दिला आहे.
देशाला प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करण्यासाठी फोक्सवॅगन कंपनीच्या स्कॅनिया कंपनीला भारतात आणून नागपूर पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.  पण नितीन गडकरींच्या या ड्रीम प्रोजेक्टला नागपूर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुंग लावला आहे. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, उदासीनता आणि नकारात्मक वृत्तीमुळे ‘ग्रीन बस’सेवा प्रकल्पाचा बट्ट्याबोळ झाला आहे. दोन महिन्यापूर्वी बससेवा चालविणाऱ्या स्कॅनिया कंपनीने यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवून सुचित केले होते. जीएसटी, एस्क्रो अकाऊंट आणि डेपोसंदर्भात महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सूचित केलं. दखल न घेतल्यास सेवा बंद करण्याचा इशाराही दिला होता. मात्र अधिकाऱ्यांनी या पत्रांना केराची टोपली दाखवल्याने आज ही वेळ आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours