मुंबई: डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अखेर पूर्ण झालाय. नालासोपारा येथे स्फोटकांसह तिघांना अटक केली आणि नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा देखील उलगडा झाला. औरंगाबादेत सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. अंदुरेच्या चौकशीतून नवीन धक्कादायक माहिती समोर आलीये. दाभोलकर यांच्यावर हल्लेखोरांनी बाईकवरून गोळीबार केला नसल्याची माहिती समोर आलीये.
20 आॅगस्ट 2013 रोजी अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सकाळी सात वाजेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते. पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर तिथून ते पसार झाले. सचिन अंदुरेच्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली. ज्या दिवशी दाभोलकरांवर गोळीबार झाला त्या दिवशी सचिन अंदुरे हा दुसऱ्या दुचाकीवरून पसार झाला होता. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. त्यात सचिन अंधुरे आणि त्याचा साथीदार दोघे ही मोटारसायकल वरून आले नाही. सचिन आणि त्याचा सहकारी दोघेही ओंकारेश्वर पुलावरच उभे होते. दाभोलकर समोरून येत असता दोघांनी त्यांच्याजवळ जाऊन गोळ्या झाडल्यात. या दोघांनी दाभोळकरांवर दोन दोन राउंड फायर केले. या दोघांकडे एकूण 3 रिव्हॉल्व्हर होत्या अशी माहिती समोर आलीये.
फायरिंग केल्यानंतर या दोघांसाठी चावी लावून मोटारसायकल तयार उभी करून ठेवली होती. त्या मोटरसायकल वरून सचिन आणि त्याचा साथीदार पळाले अशी माहिती सचिन अंधुरेंनी चौकशी दिल्याचं कळतंय.
त्याच्या या माहितीच्या आधारावरून पुलाजवळ चावी लावून कुणी गाडी आणून ठेवली होती ?, अजून किती लोकं यात सहभागी होते ? असे सवाल आता उपस्थितीत झाले आहे.
दरम्यान, सुरुवातील पोलिसांनी नोंद केलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून दाभोलकर जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक... 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या. आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी.. दोघंही हल्लेखोर पुन्हा बाईकवर बसून फरार झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली होती. पण आता मारेकरी सचिन अंदुरेने कबुली दिलीये.
दरम्यान, डाॅ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पहिली अटक करण्यात आली. याआधी विरेंद्र तावडेला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्यानंतर ही दुसरी अटक आहे. सीबीआयची कारवाई स्वागतहार्य आहे. आता सीबीआयने या प्रकरणाची पाळमुळं शोधून काढली पाहिजे अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी कोर्टाने गेल्या अडीच वर्षात तपासावर देखरेख ठेवली. आणि अंधश्रद्धा निर्मुल समितीने या प्रकरणी पाठपुरावा केला. त्यामुळे या तपासात ही प्रगती दिसतेय. लवकरात लवकर गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश मारेकरी सापडले जातील अशी अपेक्षाही हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours