डोंबिवली : भटक्या कुत्र्यांची दहशत आता लहान मुलांच्या जिवावर आलीये. शुक्रवारी डोंबिवलीतील लोढा पलावा परीसरात एका ८ वर्षाच्या मुलीवर अचानक ४-५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि अक्षरश: त्या मुलीचे लचके तोडलेत.
जवळपास ४-५ ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी त्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले असून स्थानिक रहिवाशांनी त्या मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिथे तिच्यावर उपचार केले. माही सिंग असं या मुलीचं नाव असून ती याच पलावा परीसरात राहणारी आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी संतापले असून या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास मोठं आंदोलन करू असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय.
डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून रोज अशा घटना घडत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन का करत नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. याच परीसरात गुरुवारी देखील एका महिलेवर ७-८ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यांत महिलेने प्रसंगावधान दाखवून स्वत:चा जीव वाचवला मात्र या दरम्यान महिलेचा महागडा मोबाईल मात्र फुटला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours