यवतमाळ, 06 ऑगस्ट : यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील महागांव कसबा येथील गणेश राठोड यांच्या घराच्या स्लॅबवर काल रात्री वळू चढल्याने एकच खळबळ उडाली आहे. महागांव येथील शेतकरी गणेश राठोड यांचे तांड्यात घर आहे. रविवारी सकाळी शेतात जायला निघत असताना त्यांच्या घराच्या स्लॅबवर वळू आढळला. पाहता पाहता ही खबर साऱ्या गावभर पसरली. छ्तावर चढलेला वळू पाहण्यासाठी गावकरी उत्सुक होत सर्वांची पावले राठोड यांच्या घराकडे वळली. त्याला पाहून सारेच अवाक झाले. तो रात्री घराच्या छतावर चढला. अखेर चाऱ्याची  लालच दाखवून त्याला खाली उतवरवण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यामुळे वळू वरती आणि सगळे गावकरी खाली असा सावळा गोंधळ बराच वेळ पहायला मिळाला.
छतावर चढणारा वळू पाहण्यासाठी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. पण वळू छतावर अडकून पडल्याने राठोड कुटुंब काळजीत पडले होते. त्याला खाली कसं आणावं असा मोठा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.
दरम्यान, अजूनही हा वळू छतावरच ठिय्या देवून बसलेला आहे. ग्रामस्थांनी फोनकरून पोलिसांना याबाबत सांगितलं आहे. सध्या वळूला खाली सुरक्षित कसं काढता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही प्रयन्त यशस्वी झाले नाहीत त्यामुळे वळू खाली उतरण्याची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इतर वेळी शेतात आणि गावात राडा घालणारा वळू घराच्या छतावर जाऊन बसल्याने सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे. त्यामुळे आता नेमकं हा वळू वरती चढलाच कसा आणि का चढला असावा याचा विचारात गावकरी पडले आहेत. पण त्याला खाली उतवरण्याच्या नादात सगळ्यांची दमछाक झाली इतकं नक्की.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours