मुंबई: राज्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलनानं उग्र रुप धारण केलेलं असतानाही जळगाव आणि सांगलीकरांनी भाजपवर विश्र्वास दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत. मराठा समाजाच्या मागण्या अगदी न्यायपूर्वक आहेत. त्या गेल्या कितेक वर्षांपासून प्रलंबित असल्या तरी त्याच आम्हीच पूर्ण करू असा जनतेला विश्वास आहे. आणि यामुळेच दोन्ही जिल्ह्यातील जनतेने महापालिका निवडणुकीत भाजपला कौल दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या निवडणुकीसाठी जळगांवचे गिरीश महाजन, नाथाभाऊ खडसे आणि सांगलीचे सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील या सर्वांनी मेहनत घेतली असल्याचे ते म्हणाले.
सांगली महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत एकत्र येत निवडणूक लढवली. काँग्रेसने 44 तर राष्ट्रवादीने 34 अशा 78 जागावर उमेदवार मैदानात उतरवले. तर भाजपने स्वबळावर 78 उमेदवार जाहीर केले. आज सकाळी मजमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली. दुपारपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कायम होती. त्यामुळे पुन्हा आघाडीची सत्ता येईल अशी चर्चा सुरू झाली. पण, दुपारनंतर अचानक चित्र बदलले. भाजपने आधी एका जागेनंतर दोन, म्हणत मोठी आघाडी घेतली आणि काँग्रेस आघाडीला मागे टाकलं. भाजपने सर्वाधिक 41 जागा जिंकत बहुमताचा जादुई आकडा पार केला. तर सत्ताधारी काँग्रेसला 20 तर राष्ट्रवादीला 15 जागांवर समाधान मानावे लागले. आघाडीला मिळून 35 जागा वाट्याला आल्यात. तर एकट्या भाजपने 41 जागा मिळून पालिकेवर झेंडा फडकावला.
जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये.
प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १९ प्रभागांसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे. भाजप- शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात १० वार्डामध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे आहेत, शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours