लाखनी: क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी
----लाखनी तालुक्यातील पिंपळगाव /सडक ह्या गावातील निर्मळ गाैसंरक्षण संस्था चे अफलातुन कारभार समस्त ग्रामवासियांनी उघडकीस आणला आहे.त्यामधे गावकऱ्यांचा स्पष्ट आराेप आहे कि,निरमल गाैशाळा हे २०१५ पासुन सुरु झाली असुन,भंडारा व गाेंदिया जिल्ह्यामधुन अवैधरित्या गाेधण(,जनावरं) वाहतुक करुन कत्तलखान्यात जाणाऱ्या वाहनांवर पाेलीस विभागाकडुन कार्यवाही करुन जी जनावरे पकडली जातात त्यांना त्यांच्या आराेग्याच्या दृष्टिने व सर्व जनावरांचा  पाेषनआहार व्हावा या हेतुने गाैशाळेत पाठविले जातात.दाेन्ही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कार्यवाही त आतापर्यंन्त निरमल  गाैशाळेमधे अंदाजे १०६० जनावरं आलेले असुन त्यातं सध्यास्थितीत सदर गाैशाळेत १०० ही जनावरं नसल्याचा गंभीर आराेप गावकऱ्यांनी लावलेला असुन ,मेलेल्या जनावरांचा सुद्धा चुकिचा पंचनामा केल्याचे सांगितले आहे. सदर गाैशाळेच्या मालकावर पाेलीस विभागाकडुन संपुर्ण चाैकशी करुन काेनती कार्यवाही करण्यात येते या कडे संपुर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे।।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours