बदलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोण? असा सवाल करणाऱ्या तरुणाला मनसे महिला कार्यकर्त्यांनी जाब विचारत चोप दिल्याचा व्हिडिओ वायरल झालाय. नरेंद्र मोदी यांना गणपती बाप्पा दाखवून त्यांचे अंध भक्त त्यांची पूजा करतानाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले होते. ते व्यंगचित्र राज ठाकरे यांच्या फेसबूक पेजवर पोस्ट केले गेले. या व्यंगचित्रावर कमेंट करत राज ठाकरेंना ओळखतो कोण? अशी ७० वेळा कमेंट विवेक भागवत नावाच्या एका तरुणाने त्या फेसबूक पेजवर केली होती.
मनसैनिकांनी फेसबूक पेजवरच त्याला समज दिली. मात्र तरीही तो तरुण राज ठाकरेंच्या विरोधात कमेंट्स करत होता. याचा राग मनांत धरुन मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी या विवेक भागवतला शोधू काढलं. विवेक भागवत हा बदलापूर मध्ये राहतो त्याला बदलापूर मनसे कार्यालयात बोलावून जाब विचारत मनसे महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला आणि तो व्हिडिओ सोशल मिडायावर वायरल करण्यात आला. ज्यामुळे आता या व्हिडिओची चर्चा जोरदार होऊ लागलीये.
अशा पद्धतीने विरोधात कमेंट केल्याने चोप देणं योग्य आहे याचं मनसेकडून समर्थन केले असून राज ठाकरे आणि मनसे विरोधात कोणी चुकीची किंवा वाईट कमेंट केल्यास अशाच प्रकारे चोप दिला जाईल,असा पुर्नुच्चार मनसेनं केलाय.
Post A Comment:
0 comments so far,add yours