भंडारा चे ठाणेदार सुधाकर चौहान यांनी केली होता थर्ड पार्टी गुन्ह्याची नोंद, देशातील पहिला घटना

 माहितीच्या अधिकारात पोलीस विभाग कडून माहिती  खोटी दिशाभूल करणारी मिळाली

प्रमोद भांडारकर यांचा आरोप

        फेसबुक वरील दोन व्यक्ती मधील कॉम्मेंट- रिप्लाय वादात नगराध्यक्ष या संविधानिक पदाचा दुरुपयोग करून थर्ड व्यक्ती भंडारा चे नगराध्यक्ष यांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे २/०९/२०१८ ला रात्री  ८.३० ते १.३० वाजे पर्यंत शहरातील काही समाज कंटक पोलीस स्टेशन येथे नेऊन धिंगाणा घातला. ठाणेदार, पोलीस यंत्रणा यांना वेठीस धरून राजकीय नेत्या कडून  फोन द्वारे पोलीस दबाव, पोलिसांना शिव्यागाळ करून गुन्हा नोंद्विण्यास भाग पाडले. हे सर्व cctv मध्ये फुटेज व पोलिसांच्या कमेरात रिकार्ड असतांना ठाणेदाराने गोंधळ घालणाऱ्यावर कोणतीही कारवाही केली नाही. 
सुनील मेंढे याने फेसबुक वरील दोन व्यक्ती मधील वादात कॉम्मेंट- रिप्लाय वादातील व्यक्ती बरोबर काहीही संबंध नसतांना, हा त्यांना ओळखत नसतांना, त्यांनी याला पॉवर आफ अटर्नी दिली नसतांना, कमेंट व रिप्लाय चा आपल्या सोयीने अर्थ काढून, देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्रीना शिवागाळ केल्याची खोटी दाखल तक्रार केली. 
 पोलीस ठाणेदार चौहान यांनी दिलेल्या रिपोर्ट कोणतीही  तक्रारीची चौकशी  न करता , आय टी विभागाचे तज्ञ व्यक्ती कडून तपासणी  करताच अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून हेतू परस्पर गुन्हाची नोंद केली. अटक केल्या नंतर त्याची माहित माझ्या कुटुंबाला दिली नाही, व आज पर्यंत विविध खोटी करणे पुढे करून FIR प्रत देण्यास टाळाटाळ करीत आहे, माहितीच्या अधिकार खाली माहिती मागितली असता चुकीचे बेब स्थळ माहिती मध्ये दिले. त्या वेब संकेत स्थळावर सदर अजून पर्यंत माहिती उपलोड केलेली नाही, माहितीचा अधिकार कायद्याचे आपल्या सोयीने अर्थ काढून कायद्याचे अवमान केले, व कायद्याच्या खऱ्या उद्देशालच मूठमाती दिली. त्याच प्रमाणे वृत्पात्राना देशाच्या पंतप्रधानांना व मुख्यमंत्री यांना शिव्या दिल्याची खोटी बातमी पुरविली. त्यामेळे अप्रत्यक्ष रित्या या थानेदारानेच व नगराध्यक्ष यांनीच देशाच्या प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना शिवी देल्याचे स्पष्ट होते. नगराध्यक्ष यांचे ज्या घटना स्थळाचा उल्लेख केला त्याचा पंचनामा, त्या इंटरनेट कफे ची वैधता, परवाना, विजीट बुक, cctv फुटेज, इत्यादीची तज्ञा कडून तपासणी केली नाही, घटना स्थळा वरील संगणक, इंटरनेट साहित्य, cctv मशीन ताब्यात घेणे आवश्यक असतांना अजून पर्यंत ते घेतले नाही. त्यामुळे थानेदाराचे या गुन्हा मधील व्यक्तिगत इंटरेस्ट, चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळणे, IT कायद्याचे परिपूर्ण ज्ञान नसणे, खोट्या माहितीच्या आधारावर काल्पनिक रित्या सामाजिक व राजकीय दंगे देशात घडण्याची शक्यता वर्तवून समजात थानेदारानेच अशांतता निर्माण व अंतर्गत तेढ निर्माण करण्याचा निरर्थक पर्यंत केला. ठाणेदार सुधाकर चौहान यांना निलंबित करण्यात यावे.         
सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकसी होण्या करण्याकरिता या प्रकरणाची चौकशी SIT, CID द्वारेकरणे आवश्यक आहे. हे प्रकरण त्यांचे कडे देण्यात यावे ज्यामुळे सत्यता जनतेला कळेल व कायद्याचे व पदाचे दुरुपयोग करणारयाला आळा बसेल. “मिस युज आफ पावर” या करिता लवकरच नगराध्यक्ष सुनील मेंढे यांचे वर अपात्रतेचा खटला दाखर करणार. व नगराध्यक्ष , ठाणेदार आणी खोटी साक्ष देणारे समाज कंटक यांचे विरुद्ध  मानहानी चा दावा सुद्धा ठोकणार..
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours