पुणे, ०६ सप्टेंबर- राम कदम यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यभरात महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी कदमांविरोधात जोडेमार आंदोलन केले. यात राम कदम यांच्या प्रतीकात्मक फोटोला बांगड्या भरण्यात आल्या तर अनेक ठिकाणी त्यांचे पुतले जाळण्यात आले. सातारा, जळगाव, धुळे या ठिकाणी सर्वात जास्त आंदोलनं करण्यात आली.

या सर्व प्रकारात भाजपनं आधी राम कदम जे बोलले त्याची सीडी पाहिली जाणार त्यानंतर ते योग्य तो निर्णय घेणार असल्याचे समजते. पुण्यात राम कदम यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यास सांगितले. तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मुलीला प्रपोज केलंय, पण ती नाही म्हणते. मदत हवी असेल तर मला फोन करा. तुमचे आईवडील पोरगी पसंत आहे म्हणाले,तर काय करणार मी? तिला पळवून तुमच्याकडे आणणार, असे वक्तव्य कदमांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचाच सर्वत्र विरोध होत आहे. राम कदमाचं नाव राम बदलून रावण ठेवा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली

भारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केल्याचा दावा करणाऱ्या राम कदमांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईसाठी कदमांनी सातव्या थरापर्यंत पोहोचलेल्या गोविंदाला खाली उतरायला भाग पाडलं. गोविंदांचा अपमान झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दहीहंडीचं आयोजन गोविंदा पथकासाठी की अजून कोणासाठी असा सवाल उपस्थितीत होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours