मुंबई : डॅशिंग आणि दयावान आमदार अशी जाहिरात करणारे भाजपचे आमदार राम कदम तरूणींबद्दल केलेल्या विधानामुळं चांगलेच अडचणीत आले आहेत. सोमवारी दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी सर्वांना जाहीरपणे आपला मोबाईल नंबर दिला आणि तुम्हाला कुठलही काम असेल तर मला सांगा मी मदतीसाठी धावून येईल असं सांगितलं. तुम्हाला मुलगी पसंत आहे, पण ती नाही म्हणत असेल तर मला सांगा मी तिला पळवून आणून ती मुलगी तुम्हाला देईन असं राम कदम म्हणाले आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. हा स्त्रीयांचा अपमान आहे असा आरोप करत महिला संघटनाही त्यांच्याविरूद्ध तुटून पडल्या. ज्या नाट्यमय पद्धतीने त्यांनी जो मोबईल नंबर दिला. तो नंबर आता नॉट रिचेबल आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours