नागपूर - सोशल मीडियावर हल्ली कोणीही कोणाचं फ्रेंड होऊ शकतं. सोशल मीडियावर मैत्री होण्यासाठी ओळखीची गरज आहे असे काही नाही. पण आपल्याला माहीत नसलेल्या व्यक्तींना फेसबुकवर का अॅड करा असा विचार करून अनेकजण अनोळखी व्यक्तींची फेसबुक रिक्वेस्ट डिलीट करतात. पण आता फेसबुक रिक्वेस्ट डिलीट करणं जीवावरही बेतू शकतं. नागपूरमध्ये फेसबुक रिक्वेस्ट डिलीट केली म्हणून रोहित हेमलानी या युवकाने सानिका प्रदीप थुगांवकर या अठरा वर्षांच्या मुलीची हत्या केली. गेल्या पावणेतीन महिन्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र अखेर आत सानिकाने अखेरचा श्वास घेतला.
घरची परिस्थिती अत्यंत बेताची असणारी सानिका टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षण घेतानाच ती अशोका हॉटेलसमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमलगत तिच्या मामाच्या (अविनाश पाटणे) फायनान्स कार्यालयात कामही करायची. १ जुलैला साधारण ७ वाजून ४५ मिनिटांनी रोहित तिच्या कार्यालयाजवळ गेला. तेव्हा रोहितने पँटमध्ये लवपून ठेवलेला चाकू बाहेर काढून अचानक सानिकावर चाकूचे सपासप वार केले.
छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती गंभीर जखमी झाली. तेव्हापासून सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सानिकाच्या आई वडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला. पावणेतीन महिन्यात तिच्या उपचारांचा खर्च २५ लाखांहूनही अधिक झाला. आपली पोटची मुलगी वाचावी म्हणून भाबडे आई- वडील सर्व काही करत होते. सानिकानेही तब्बल पावणेतीन महिने जगण्या- मरण्याची लढाई लढली मात्र आज तिचा संघर्ष थांबला.
Post A Comment:
0 comments so far,add yours