मुंबई : सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत उभे असताना दरवाजा ठोठावला म्हणून एका वृद्धाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वडाळा इथं घडलीये. फुलचंद यादव असं हत्या करण्यात आलेल्या इसमाचं नाव असून पोलिसानी आरोपी शाकीरअली शेख याला बेड्या ठोकल्यात. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वडाळा संगमनगर मध्ये राहणारे फुलचंद रात्री 9.30 च्या सुमारास शौचाला गेले होते. ते नैसर्गिक विधी आटोपत असताना शौचालयात रांगेत उभे असलेल्या शकीर अलीने दरवाजा जोराने थोटावला. तेव्हा वृद्धाने थोडा वेळ थांबण्यास सांगितलं. ते ऐकून शाकिर अलीचा राग अनावर झाला. तो जोराने दरवाजा थोटावू लागला. फुलचंद विधी उरकून बाहेर पडताच दोघात शाब्दिक चकमक उडाली. रागावलेल्या शाकीरअलीनं फुलचंद यांना मारहाण केली आणि त्यांचा मृत्यू झाला.
ठोसा बसताच फुलचंद शौचालयालगत वाहणाऱ्या उघड्या नाल्यात पडून बुडाले. ते पाहून शाकीरअलीने घटनास्थळावरून पळ काढला. शौचालयाजवळ उभ्या असल्याने नागरिकांनी फुलचंदला बाहेर काढले. मात्र शिव रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी शाकिरला काही तासातच बेड्या ठोकल्या. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी शाकीरअली सरमुल्ला शेख याला अटक केली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours