कोल्हापूर: कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला चॉकलेट दिल्यामुळे चक्क विद्यार्थ्याची नग्न धिंड काढण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरसंगी गावातील गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. फक्त मुलीली चॉकलेट दिल्याच्या निमित्ताने गावकऱ्यांनी मुलाची नग्न धिंड काढत त्याला शिवीगाळ केल्याचंही उघड झालं आहे.
जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पीडित मुलाने केला आहे. दरम्यान पीडित मुलाला संतप्त जमावाकडून मारहाणही करण्यात आली. सध्या जखमी विद्यार्थ्यावर नेसरीच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्या खळबळजनक प्रकारावरून मुलाच्या वडिलांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुलीचा चुलता आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतय.
तर पीडित मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. परिसरातील वातावरण शांत व्हावा यासाठी शिरसंगी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours