रिपोर्टर :  परदेशी
भंडारा - माैजा बेला येथील कु.  मयुरी धनराज लुटे प्रथम वर्ष हिने ज्युनियर टँक् एशिया चँम्पीयनशिप सायकलिंग प्रतियोगिता मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या एशिया सायकलिंग स्पर्धेमध्ये भाग घेऊन 500 मीटर सायकल चालवून अथक परिश्रमाने प्रथम क्रमांक मिळविला.  त्यामुळे त्यांना दाेन स्वर्ण पदक मिळाले. या कन्येने देशाचा, गावाचा व स्वताबराेवर आई वडलांचाही नाव जगात उंचावला. तिच्या या कार्याचा गाैरव करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा ऩिर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लाेणारे, अध्यक्ष हर्षल मेश्राम   प्रधान सचिव कन्हैया नागपूरे,  चंद्रशेखर भिवगडे, यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व भारतीय राज्य घटनेची पुस्तक देऊन बेला येथे मयुरी लुटे हिचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी मयुरी लुटे म्हणाली मुलींना उत्कृष्ट कार्यासाठी समाज व कुटूंबांने आपली मानसिकता बदलवून याेग्य ते सहकार्य केल्यास मुली काेणत्याही क्षेत्रात मागे पडू शकत नाही. या कार्यासाठी शिक्षक अर्जून बुदे व वडील धनराज लुटे यांचे माेलाचे सहकार्य आहे असे सांगितले. यावेळी मअंनिसचे अध्यक्ष हर्षल मेश्राम यांनी क्रुतिशील व मनातून जिद्द असलेल्या लुटे यांचा काैतुक केला. व त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच साै. पुजा ठवकर, सदस्य चे़तना नारनवरे,  अशाेक वघरे, बंडू मतेे, विकास निंबार्ते, बबलू कांबळे, अर्चना कांबळे, धनराज गाढवे, लिलाधर बंसाेड  उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours