फलरोप वाटिका भंडारा येथील एकूण ३४९ झाडांचे  वन विभागा मार्फत मूल्यांकन करण्यात आले . गट न. ३६९, ३७२, ३७३, या गटा तील झाडांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात सागवनचे ३८ झाडे आंब्याचे ११ झाडे व इतर आदजातीचे ३०० झाडे असून एकूण ३४९ झाडांचे मूल्यांकन करण्यात आले. 
मिळालेल्या माहिती नुसार  सागवनच्या ३८ झाडांची किंमत अंदाजे तीन लक्ष पन्नासहजार , आंब्याच्या ११ झाडांची किंमत दोन लक्ष रुपये व इतर आडजातीचे ३०० झाडांची किंमत अंदाजे एकलक्ष पन्नासहजार रुपये असल्याची मिळाली असून एकूण ३४९ झाडाची किंमत अंदाजे सहा लक्ष पन्नासहजार असून कृषी पर्यवेक्षक फ़ळरोप वाटिका भंडारा व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांला फायदा पोहचविण्यासाठी मुद्दामून झाडाचे मूल्यांकन एक लक्ष पांच्यांनव हजार दाखवण्यात आली आहे. त्या मुळे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने शासनाचा महसूल बुडाल्याची बातमी समोर येत आहे.
वरील सर्व प्रकिया रद्द  करण्यात यावी व नव्याने झाडांचे मूल्यांकन करून निविदा काढण्यात यावी. आशि मागणी जनतेतून होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours