ठाणे: मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झालं असून, सोमवारी सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शनिवारी कौसा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली. बायपासचे काम सुरू झाल्यानंतर शिळफाटा ते भिवंडी मार्गावरील वाहतूक कल्याण-डोंबिवली शहरातून सुरू झाली होती. मुंब्रा बायपास पुन्हा नव्याने श्वास घेणार असल्यामुळे लवकरच कल्याण-डोंबिवलीकरांना वाहतुकीच्या कोंडी सामना करावा लागणार नाही.
डागडुजी आणि नवीन बांधणीकरता मुंब्रा बायपास सुरूवातीला १६ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, तो बंद केल्यानंतर जी मोठी वाहतून कोंडी निर्माण होणार होती त्यासाठी वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे.एन.पी.टी. यांची पुर्व तयारी नसल्याने हे काम पुढे ढकलण्यात आलं होतं.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 7 मे पासून मुंब्रा बायपासच्या डागडुजीला मंजूरी दिली. हे काम २ महिने सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. डागडुजीच्या या कामामुळे शिळफाटा ते भिवंडी मार्गावरील वाहतूक कल्याण-डोंबिवली शहरातून सुरू झाल्याने, कल्याण डोंबिवलीकर वाहतूक विभागाच्या या नियोजनावर चांगलेच संतापले होते. मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झालं असून, सोमवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती शनिवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours