जिल्हा संपादक शमीम आकबानी  ,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर 
लाखनी - लाखनी येथे ८-९-२०१८ ला जिल्हा पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांच्या मार्गदर्शनात लाखनी पाेलीसांकडुन मेमन हॉल मधे सर्व गणेश उत्सव मंडळाच्या शिष्टमंडळांना बाेलावुन गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याचे दिशानिर्देश देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयाेजन लाखनी पाेलीस निरीक्षक मंडलवार,पाेलीस उपनिरीक्षक ताराम, खुफीया विभागाचे प्रकाश तांडेकर,उमेश शिवनकर तसेच सर्व पाेलीस कर्मचाऱ्यांनी केले हाेते. या कार्यक्रमात प्रामुख्याने लाखनी चे प्रथम नागरिक (नगरपंचायत अध्यक्षा) ज्याेति निखाडे,उपाध्यक्ष मायाताई निंबेकर,माजी उपसरपंच उर्मीला आगाशे,गफ्फार भाई आकबानी,नगरसेवक विक्रम राेडे तसेच सर्व तंटामुक्त समिती चे सदस्य ,पाेलीस पाटील,व डीजे साऊंड व सर्व गणेश उत्सव मंडळाचे सदस्य हजर हाेते.
यावेळी जिल्हा पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांनी संबाेधित केले कि,गणेश उत्सव साजरा करन्याकरिता  आता परवानगी घेन्यासाठी आँनलाईन अर्ज दाखल करावे लागत आहे. जिल्ह्यात ३५० गणेश उत्सव मंडळ असुन आतापर्यंन्त ४९ मंडळांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.स्थापना करनाऱ्यांनी वेळीच ऑनलाईन अर्ज करुन परवानगी मंजुरी मिळवुन घ्यावी जेणेकरुन मंजुरी देणे हे शक्य हाेईल.सर्व गणेशाेत्सव मंडळांनी आपल्या मंडळामधे डायरी ठेवावी प्रत्येकांनी प्रशिक्षणासाठी आपले मार्गदर्शक नेमावे.खास करुन गणेशाेत्सवाच्या वेळी दर्शण करन्यास आलेल्या महिलांचे काेनीही छळ करु नये याची दक्षता घेऊन याेग्य झाल्यास सीसीटिवी कँमेरे लाऊन घ्यावे.याेग्यरितीने दर्शनास आलेल्या महिलांसाठी वेगळी रांग तयार करुन घ्यावी.व मा.सुप्रिम काेर्टाच्या आदेशानुसार डिजे मधुन निघनारा कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण आणन्यासाठी ध्वनी प्रदुषन अधिनीयम २०००तयार करन्यात आला अाहे.याची सर्वांनी दक्षता घेऊनच गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुक अश्या दाेन्ही वेळेस मंडळानी याची दक्षता घ्यावी. आपल्या कडुन गणेश विसर्जनाच्या वेळी दुसऱ्या काेणत्याही अन्य समुदयाला आपल्याकडुन काेनताही त्रास हाेता कामा नये याची दक्षता सर्व मंडळांनी घेतली पाहीजे अशी समज या वेळी जिल्हा पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांच्या कडुन देण्यात आली.कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन पाेलीस उपनिरीक्षक ताराम यांनी केला.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours